Ad will apear here
Next
सावरकरांची नात म्हणून लंडनमध्ये तिरंगा फडकवताना अभिमान वाटला
शाहीर विनता जोशी यांचे रत्नागिरीतील कार्यक्रमात प्रतिपादन
शाहीर विनता जोशी आणि सहकारी

रत्नागिरी :
‘ज्या ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनन्वित अत्याचार केले, त्याच ब्रिटिशांच्या लंडनमध्ये सावरकरांची नात म्हणून भारताचा तिरंगा फडकवण्याचे भाग्य मला गेल्या वर्षी लाभले. त्या वेळी ऊर अभिमानाने भरून आला होता,’ अशा शब्दांत शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आपल्या भावना व्यक्त केल्या. सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी पतित पावन मंदिरात ‘नमन वीरतेला’ हा त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सादर केलेल्या पोवाड्यांतून सावरकरांचा जीवनसंग्राम उलगडला आणि श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.



पतित पावन मंदिर, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरीतील सावरकरप्रेमी, तसेच पुण्यातील ओडिसी व्हॉयेज इंडिया (एलएलपी) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘नमन वीरतेला’ या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन डॉ. नयना कासखेडीकर यांचे होते. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सावरकरांच्या जाज्ज्वल्य कार्याची व साहित्याची महती अभिवाचनाच्या माध्यमातून कथन केली. शाहीर विनता जोशी व त्यांच्या सहकलाकारांनी पोवाड्यांच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनपट उभा केला.

डॉ. नयना कासखेडीकर आणि सहकारी

विनता जोशी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात. सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच १९८३पासून विनता जोशी सावरकरांची जीवनगाथा उलगडणारा ‘नमन वीरतेला’ हा कार्यक्रम सादर करत आहेत. त्या वेळी त्या दहावीत होत्या. ‘सावरकरांचे जन्मगाव असलेले भगूर, शिक्षण झालेले नाशिक, पुणे, तसेच त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेले अंदमान आणि त्यांची कर्मभूमी रत्नागिरी अशा सावरकरांच्या आयुष्यातील प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रम सादर केले आहेत. गेल्या वर्षी लंडनमध्ये कार्यक्रम झाल्यामुळे ही सावरकर परिक्रमा पूर्ण झाली होती; मात्र पतित पावन मंदिर या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी मात्र कार्यक्रम झाला नव्हता. तो योग आज १०७व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधला गेला. त्यामुळे सावरकर परिक्रमा खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेली आहे,’ अशी भावना विनता जोशी यांनी व्यक्त केली.  



गोविंदस्वामी आफळे यांनी सावरकरांच्या जीवनावर लिहिलेल्या पोवाड्यासह वेगवेगळ्या पोवाड्यांचे वीररसपूर्ण सादरीकरण विनता जोशी यांनी केले. झाशीच्या राणीवरील पोवाड्याचाही त्यात समावेश होता. आज महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत; मात्र त्या काळी झाशीच्या राणीकडे महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी होती, याचा विशेष उल्लेख जोशी यांनी केला. सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरतीही जोशी यांनी सादर केली. या सादरीकरणांतून सावरकरांचे क्रांतिकार्य, त्यांची दूरदूष्टी, त्यांचे ध्येय, उदात्त विचार, त्यांचा संघर्ष, त्यांची साहित्यनिर्मिती आणि एकंदरीतच त्यांचा जीवनपट उलगडला. अख्खे सावरकर कुटुंबच कसे देशकार्यात सहभागी झाले होते, हेही त्यांनी यातून मांडले.



डॉ. नयना कासखेडीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिवाचनातून सावरकरांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यातील काही पैलू उलगडले. सावरकरांनी बालवयात असताना केलेल्या कविता, आईशी आणि वडिलांशी असलेले उत्कट नात्याचे भावबंध, येसूवहिनीच्या रूपाने त्यांना गवसलेली आई, सखी, येसूवहिनीच्या नजरेतून स्वातंत्र्यवीर, सावरकरांच्या पत्नी माई यांनी सावरकरांच्या कार्याला लावलेला हातभार, महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांनी रत्नागिरीत सावरकरांची भेट घेतली तेव्हा माईंचे योगदान ओळखून आवर्जून माईंना केलेले वंदन, व्रतवैकल्यांबद्दल असलेला सावरकरांचा दृष्टिकोन अशा सावरकरांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या अनेक घटना/आठवणी या अभिवाचनातून उलगडत गेल्या.

अॅड. बाबा परुळेकर यांच्या हस्ते विनता जोशी यांचा सन्मान

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पतित पावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी विनता जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. ‘सावरकरांची नात या मंदिरात येणे आणि त्यांचा कार्यक्रम येथे सादर होणे, हा अभूतपूर्व योग आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘नमन वीरतेला’ या कार्यक्रमाच्या टीमसह मुंबई-पुण्यातील सावरकरप्रेमींना या ठिकाणी घेऊन येणाऱ्या ओडिसी व्हॉयेज इंडिया (एलएलपी) संस्थेच्या मानसी नगरकर-जाधव यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले. सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने येथे यावेत, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक वांदरकर गुरुजी यांचा सत्कार

सावरकर यांना प्रत्यक्ष भेटलेले आणि आता १०३ वर्षांचे असलेले वांदरकर गुरुजी यांचा संस्थेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन ज्यांचे आहे, त्या डॉ. नयना कासखेडीकर यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. नयना कासखेडीकर यांचा सन्मान

कार्यक्रमाला रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचे सभागृह पूर्ण भरून गेले होते. 



(सोबत व्हिडिओ देत आहोत.)




सावरकरांचे विविध पैलू उलगडणारे लेखन वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.  

रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZMKCA
Similar Posts
सावरकर जयंतीला त्यांच्या नातीचा रत्नागिरीत विशेष कार्यक्रम रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची नात शाहीर विनता जोशी यांचा ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा मे महिन्यात रत्नागिरीत प्रयोग रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग मे महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. नाटकाच्या तिकिटांची विक्री होणार नसून, नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य द्यायचे आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे
स्वा. सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा १६ मे रोजी रत्नागिरीत प्रयोग रत्नागिरी : भाषाशुद्धीपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत अनेक क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या अंदमानमधील शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग १६ मे रोजी रत्नागिरीत म्हणजेच स्वातंत्र्यवीरांच्या कर्मभूमीत होणार आहे
सावरकरांचे कार्य क्रांतियुद्धाचा पाया रचणारे रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळण्यासाठी ‘जोसेफ मॅझिनी’ आणि ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ही पुस्तके लिहिली. मित्रमेळा या नावाने संघटना सुरू करून क्रांतिकारकांना जोडण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. अवघ्या तीन जणांपासून सुरू झालेल्या या संघटनेचा पुढे ‘अभिनव भारत’च्या रूपाने विशाल वृक्ष होत गेला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language